Health : मंकीपॉक्सचा विषाणू भारताच्या शेजारील देशात म्हणजेच पाकिस्तानात आता पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर राज्य सरकारने याबाबत खबरदारीसाठी आरोग्य यंत्रणेला सूचना जारी केल्या आहेत. विमानतळे बंदरांवरून मंकीपॉक्स रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने आरोग्य अधिकारी यांची नियमित समन्वय ठेवण्याचा सूचना केल्या आहेत. तसेच मंकी पॉक्स रुग्णांच्या विलगीकरणासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. त्याचा रुग्ण दोन ते चार आठवड्यात बरा होतो, परंतु लहान मुलांमध्ये आणि इतर काही रुग्णांमध्ये तर गंभीर स्वरूपही धारण करण्याची शक्यता आहे. या आजाराचा मृत्यू दर हा सर्वसाधारणपणे तीन ते सहा टक्के असल्याने राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
विलगीकरणासाठी आवश्यक यंत्रणा उभारा..
मंकीपॉक्स संदर्भात विमानतळे आणि बंदरांवर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. खातरजमा करून संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी अशा सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. स्वतंत्र व्हेंटिलेशनची व्यवस्था या रुग्णांसाठी असावी असे सुद्धा मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.
रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
- रुग्णाच्या कातडीवरील फोड पुरळ पूर्ण बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाहीत तोपर्यंत त्याला
- विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे.
- रुग्णाला लक्षणानुसार उपचार द्यावे, पाण्याचे प्रमाण घेईल याची दक्षता घ्यावी.
- मंकीपॉक्सचा जर संसर्ग झालेला असेल तर रुग्णाने ट्रिपल मास्क लावणे आवश्यक आहे.
- रुग्णाच्या कातडीवरील पुरळ फोड पूर्ण झाकलेली असावीत. यासाठी त्याने लांब बाह्यांचे शर्ट, आणि पॅन्ट वापरावी.
मंकीपॉक्स पासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?
मंकी पॉक्स होऊन नये यासाठी काय काळजी घ्यावी? यासाठी ही सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. त्यानुसार आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करण्यासह सविस्तर मार्गदर्शक सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. काल दिल्लीमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातील आरोग्य यंत्रणे सोबत बैठक झाली. या बैठकीनंतर नेमका काय उपचार व्हावा? कशा पद्धतीने रुग्ण मिळाल्यास पुढे यावे या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.