डॉ. रोहन चौगुले
पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या बदलत्या वातावरणामुळे काही आजार बळावू शकतात. त्यातच देशातील काही भागांमध्ये लहान मुलांसाठी गंभीर असा चांदीपुरा व्हायरसचा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळेच हा व्हायरस नेमका काय? त्याची लक्षणे काय? त्यावर उपाय काय? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
चांदीपुरा व्हायरसची लक्षणे काय?
चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या मुलांना अचानक जास्त ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी, मेंदूला सूज येणं यासारखी लक्षणं दिसतात. ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर काही तासांच्या आत दगावतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
चांदीपुरा व्हायरसपासून कसा कराल बचाव?
या जीवघेण्या व्हायरसपासून लहान मुलांचे रक्षण करणे मोठं आव्हान असतं. मात्र, आपल्या लहान मुलांना डास, माशा आणि कीटकांपासून दूर राहा. डास चावण्यापासून वाचण्यासाठी रात्री मच्छरदाणीचा वापर करा. घरामध्ये कडुलिंबाचा पाला जाळा. आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास वेळीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हे घरगुती उपाय नक्की करा…
डास, माशा आणि कीटकांपासून दूर राहणं सर्वात महत्वाचं आहे. यासाठी मुलांना रात्री आणि सकाळ-संध्याकाळी फुल स्लीव्ह अर्थात पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. डास चावण्यापासून वाचण्यासाठी रात्री नेट वापरा. मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. जर काही लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करावे.
(लेखक हे बालरोगतज्ञ आणि नवजात शिशु तज्ञ आहेत)