पुणे : नागरिकांनो सावधान ! जर तुम्ही पॅकिंगचे दूध खरेदी करत असता, तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, एका नामांकित कंपनीच्या दुधाच्या पॅकेटमध्ये झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार विरार (मुंबई) परिसरात नुकताच उघडकीस आला आहे.
ज्ञानदेव खरे (रा. चंदनसार रोडवरील कातकरी पाडा, विरार पूर्व) यांनी ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाला माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव खरे यांनी नेहमीप्रमाणे दूध खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी गुड मॉर्निंग कंपनीच्या दुधाची एक लिटरचे पॅकेट दुकानातून विकत घेतले.
मात्र, या पॅकेटमध्ये त्यांना काळ्या रंगाचे झुरळ तरंगताना दिसून आले. खरे यांनी हि माहिती तत्काळ दूध विक्रेत्या दुकानदाराला दिली.
त्यानंतर खरे यांनी दुकानदाराच्या मदतीने दूध वितरित करणाऱ्या एजन्सीशी संपर्क केला. मात्र, या प्रकारावर संबधित दूध वितरक कंपनीकडून कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर खरे यांनी या सर्व घटनेची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली.
दरम्यान, नागरिकांनो सावधान! तुम्ही जर पॅकिंगचे दूध खरेदी करीत असाल तर तुमच्या पॅकिंग दुधाच्या पिशवीत झुरळ असू शकते. त्यामुळे नागरिकांनी पॅकिंग दूध विकत घेताना काळजी घेतली पाहिजे.
याबाबत बोलताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परमेश्वर सिंगदवार म्हणाले कि, खरे यांच्या तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला आहे.
या प्रोडक्टच्या होणाऱ्या पॅकिंगच्या वेळी हे झुरळ दुधात पडले असावे, अशी शक्यता अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्तवली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीवर कारवाई सुद्धा करणार आहे.