पुणे : नामांकित कंपनीच्या दुधाची पाकिटे एका कोपऱ्यात फोडून त्यामध्ये पाणी टाकून स्टोव्ह, पीन व मेनबत्तीच्या सहाय्याने पुन्हा पॅकेटचा कोपरा सिल करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
वीरेय्या रोशैय्या गज्जी, (वय – ५२), श्रीनिवास नरसय्या वडलाकोंडा (वय – ३९), नरेश मरेया जडाला (वय -२९), अंजैय्या गोपालू बोडपल्ली (वय – ४२) रमा सत्यनारायण गज्जी (वय- ३०) रा. सर्वजन रा. ठी चव्हाण चाळ, चाळ नं. ९, काजुपाडा गावदेवी रोड, भोईसर, कांदिवली पूर्व, मुंबई) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई विभाग व गुन्हे शाखा नियंत्रण, आर्थिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, रा. ठी चव्हाण चाळ, चाळ नं. ९, काजुपाडा गावदेवी रोड, भोईसर, कांदिवली पूर्व, मुंबई या राहत्या ठिकाणी काही नागरिक गोकुळ व अमूल या नामांकित कंपनीच्या दुधाची पाकिटे एका कोपऱ्यात ब्लेडने कापून त्यामधील काही दुध काढून त्या पॅकेटमध्ये पाणी टाकून स्टोव्ह पीन व मेनबत्तीच्या सहाय्याने पुन्हा पॅकेटचा कोपरा सिल करीत आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गोकुळ व अमूल या नामांकित कंपनीच्या दुधाची पाकिटे एका कोप यात ब्लेडने कापूनपॅकेटमध्ये पाणी टाकून स्टोव्ह पीन व मेनबत्तीच्या सहाय्याने कोपरा सिल करीत असताना आढळून आले. सदर पाच ठिकाणी टेंम्परड दुधाचे एकूण नऊ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. सदर पाचही ठिकाणावरील एकूण १०६४ लिटर, ६२ हजार रुपये एवढ्या किंमतीचा टेंम्परड दुधाचा साठा नष्ट करण्यात आलेला आहे. सदर पाचही इसमांनविरूद्ध समतानगर पोलीस ठाणे, कांदिवली येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला असुन पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.
सदरची कामगिरी सदर ची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे संजयजी राठोड व अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) श्री. बि. एन. चव्हाण यांचे नेतृत्वाखाली बृहन्मुंबई विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घुमरे व सुमित खांडेकर यांनी केली.