Big News नवी मुंबई : डॉक्टरांची परिषद सुरू असतानाच, छाती व श्वसनरोग विभागप्रमुखांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नेरूळ (नवी मुंबई) येथे शुक्रवारी (ता.४) घडली आहे. या परिषदेला तब्बल पंचवीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असतानाही डॉक्टरला वाचवण्यात अपयश आले आहे. या घटनेमुळे नेरूळसह नवी मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे. (Big News)
डॉ. अभय उप्पे (वय-५०) असे मृत डॉक्टरांचे नाव आहे. ते नेरूळच्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये छाती व श्वसन रोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. (Big News)
मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळमधील कोर्टयार्ड बाय मेरिएट येथे डॉक्टरांसाठी अद्ययावत ज्ञान उपक्रमांतर्गत (सीएमई) सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील छाती व श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. अभय उप्पे (चेस्ट फिजिशियन) यांनी मार्गदर्शन केले. (Big News)
दरम्यान, डॉ. अभय उप्पे यांना अस्वस्थ वाटू लागले. आपल्याला बरे वाटत नसल्याचे सांगून ते सेमिनारमधून घरी जाण्यासाठी निघाले. परंतु, हॉटेलच्या लिफ्टजवळ आल्यानंतर त्यांना छातीत जोरदार कळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. व डॉक्टरांनी मदतीसाठी आवाज दिला.
त्यानंतर उपस्थित डॉक्टर्सनी लिफ्टजवळ धाव घेतली. तेथे डॉ. अभय उप्पे यांना लगेच सीपीआर देण्यात आला. गरज ओळखून लागलीच कार्डियाक ॲम्ब्युलन्स बोलावून घेण्यात आली. ११ मिनिटांत रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
रुग्णवाहिका अपोलो हॉस्पिटलला पोहताच त्यांना कॅथलॅबमध्ये दाखल करण्यात आले. तेथे चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट यांनी त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु डॉ. अभय उप्पे यांना वाचवण्यात त्यांना यश आले नाही.
डॉ. उप्पे यांच्या पश्चात दंतचिकित्सक पत्नी, आई आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नेरूळ येथे शनिवारी (ता.०५) सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा असतानाही डॉ. उप्पे यांचा जीव वाचवता आला नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे.