सुपारीचे पान हे गुणकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुपारीचं पान हे नुसतं खायलाच नाहीतर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कारण, या पानामुळे हृदयविकाराचा त्रास दूर होतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. इतरही अनेक फायदे आहेत. याची माहिती आपण आता घेणार आहोत.
औषध न घेता ताप बरा करायचा असेल तर साधारण 3 मिली सुपारीचा अर्क गरम करून प्या. मिरगीच्या आजारातही सुपारीचे सेवन करणे चांगले. आयुर्वेदानुसार, तुमच्या आहारात योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सुपारीचा समावेश करून तुम्ही असे आरोग्य फायदे मिळवू शकता.
आयुर्वेदानुसार, सुपारीची पाने चघळल्याने तुम्ही तुमचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकता. सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी सुपारीच्या पानांचाही उपयोग होतो. एवढेच नाही तर सुपारीच्या पानांमध्ये आढळणारे सर्व घटक श्वसनाच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली सुपारीची पाने केवळ तुमचे आरोग्य सुदृढ करण्यासाठीच नाही तर काही गंभीर आजारांचा धोका कमी करण्यातही प्रभावी ठरू शकतात. तुम्हालाही दिवसभर अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर सुपारीच्या पानांचे सेवन सुरू करा. याने फायदा होऊ शकतो.