आपल्या निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत त्याचा आपल्या आहारात समावेश केल्यास आरोग्य चांगलं राहू शकतं. त्यात फळे, भाज्या हे तर आहेच शिवाय मोड आलेले कडधान्य देखील उत्तम आणि गुणकारी ठरतात. या मोड आलेल्या कडधान्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला अजूनही माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.
मोड आलेल्या कडधान्यामध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्वे असतात. जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. काही कडधान्य पचायला हलकी असतात, तर काही पचायला जड जातात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी आहे. तसेच उडीद आणि हरभरा आणि पावटा हे आपल्याला पचायला सर्वात कठीण असतात. त्यामुळे हे खाताना थोडं लक्ष देणं गरजेचं बनते.
मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘क’ हे जीवनसत्वे आढळतात. मोड आलेल्या कडधान्य हे पौष्टिक आहार असून, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स अर्थात दुष्परिणाम होत नाहीत. मोड आलेल्या धान्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात कडधान्याचा समावेश करा. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहिलं.
कडधान्य करतात कॅलरी कमी
अनेकांना भूक कमी लागण्याची समस्या जाणवते. मात्र, तुम्हाला देखील ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही मोड आलेली कडधान्य खावीत. त्याने खूप फायदा होणार आहे. याशिवाय, जर तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कडधान्य खाऊ शकता. कारण त्यामध्ये कॅलरी कमी असतात. याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.