पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या हेल्दी आणि नैसर्गिक पर्यायांचा वाढता ट्रेंड पाहता, लेमनग्रास टी म्हणजेच गवती चहाची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. केवळ चवीलाच नव्हे, तर आरोग्यविषयक अनेक फायदे मिळवून देणारा हा हर्बल चहा दररोजच्या जीवनात सहज घेता येतो.

‘लेमनग्रास’ म्हणजे काय?
लेमनग्रास, ज्याला मराठीत गवती चहा म्हटलं जातं, हे एक सुगंधी औषधी रोप आहे. याच्या पानांपासून तयार केलेली चहा अंगाला उबदार बनवते.

लेमनग्रास टीचे आरोग्यदायी फायदे
1. पचन सुधारते
लेमनग्रास टीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. अपचन, गॅस, आणि सूज यावर आराम मिळतो.
2. डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत
हा चहा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो आणि लिव्हरच्या आरोग्यास फायदेशीर ठरतो.
3. तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत
लेमनग्रासचा सुगंध मेंदूला शांत करतो, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि झोपही चांगली लागते.
4. प्रतिकारशक्ती वाढवतो
लेमनग्रास टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
5. ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो
नियमितपणे लेमनग्रास टी घेतल्यास उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
6. वजन कमी करण्यात मदत
हा चहा नैसर्गिकरित्या मेटाबॉलिझम वाढवतो आणि चरबी कमी करण्यात मदत करतो.
लेमनग्रास टी कसा तयार करावा?
1. एक कप पाण्यात 4–5 लेमनग्रासची पाने किंवा चिरलेला गवती चहा टाका.
2. ते 5–7 मिनिटं उकळा.
3. गाळून कपा मध्ये ओता. हवे असल्यास मध किंवा आले घालू शकता.
टीप: कोणतीही हर्बल टी रोज पिण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम. विशेषतः गरोदर महिला किंवा विशिष्ट आजारांनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचा वापर करावा.







