Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वारीनिमित्त अजय गोगावले यांच्या आवाजातलं ‘ओढ तुझ्या पंढरीची’ प्रेक्षकांच्या भेटीला; माऊली म्युझिक कंपनीचं नवं गाणं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 June 2025, 20:12

पंढरपूर वारीचा शुभमुहूर्त, लाखो भाविकांची विठ्ठलभक्ती आणि श्रद्धेचा सागर याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे. “ओढ तुझ्या पंढरीची” असं या गीताचं शीर्षक असून, हे माऊली म्युझिक कंपनीच्या वतीने प्रदर्शित झालेलं त्यांचं पहिलं गाणं आहे. सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या प्रभावी आवाजात हे गीत सादर करण्यात आलं आहे.

कलात्मक सादरीकरण आणि भावस्पर्शी संगीत
या गीताला नितीन उगलमुगले यांनी संगीतबद्ध केलं असून, मुकुंद भालेराव यांनी गीतलेखन केलं आहे. गाण्याच्या शीर्षक ओळीचे श्रेय अपूर्व राजपूत यांना जातं. गीताचं दिग्दर्शन पवन लोणकर यांनी केलं असून, संगीत संयोजन पद्मनाभ गायकवाड, ध्वनिमुद्रण व मिश्रण विनायक पवार यांचे आहे. तर संपादन (एडिटिंग) धीरज भापकर यांनी केलं आहे. हे गाणं ३४० व्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी प्रदर्शित झालं असून, त्याला रसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. युट्यूबसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर हे गाणं लोकप्रियतेच्या शिखराकडे झपाट्याने वाटचाल करत आहे.

वारकऱ्यांच्या मनातील ओढ व्यक्त करणारी संकल्पना
संगीतकार नितीन उगलमुगले सांगतात, “आम्ही याआधी ‘मायबापा विठ्ठला’ हे भक्तिगीत सादर केलं होतं आणि त्याला भरभरून प्रेम मिळालं. त्या यशातून प्रेरणा घेऊन मी, मुकुंद भालेराव आणि पवन लोणकर – आम्ही ‘माऊली म्युझिक कंपनी’ सुरू केली. आमची पार्श्वभूमी ही वारकरी संस्कृतीशी जोडलेली असल्यामुळे भक्तिगीतं हा आमच्या संगीत प्रवासाचा केंद्रबिंदू असणार आहे.” “‘ओढ तुझ्या पंढरीची’ हे आमचं पहिलं गाणं अजयदादांच्या आवाजात साकार झालं आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी फारच उत्साहवर्धक आहे,” असंही ते नमूद करतात.

भक्तीचा अनुभव नव्या पिढीपर्यंत
या गीतामधून वारीतील चालती श्रद्धा, विठ्ठल भेटीची तळमळ आणि वारकऱ्यांच्या मनातील ओढ – हे सगळं प्रामाणिकपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात आलं आहे. माऊली म्युझिक कंपनी लवकरच आणखी भक्तिगीतं व भावस्पर्शी संगीत प्रकल्प घेऊन येणार आहे. “आमचा उद्देश असा आहे की, भक्ती आणि सांस्कृतिक संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवावं, नवोदित कलाकारांना संधी द्यावी आणि पारंपरिक संगीत नव्या स्वरूपात सादर करावं,” असंही उगलमुगले यांनी सांगितलं. “ओढ तुझ्या पंढरीची” हे गाणं विठ्ठल भक्तीमध्ये रंगून जाणाऱ्यांसाठी एक अनोखा, आत्मिक आणि अध्यात्मिक अनुभव देणारं गीत ठरत आहे. युट्यूबसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर हे गीत पाहता आणि ऐकता येऊ शकतं.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

पावसाळ्यात योनी संक्रमण वाढते? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका! वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp