आपल्या निसर्गात अनेक वनस्पती, फळे-भाज्या आहेत त्याचे विशेष फायदेही असतात. त्यापैकी एक म्हणजे आवळा. आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ भरपूर प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन केसांना चमकदार बनवते.
आवळा हा अनेक आजारांवर गुणकारी मानला जातो. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांनी आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करावा. आवळ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. आवळ्यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याने जे केवळ त्वचा निरोगी ठेवत नाही तर केसांना चमकदार बनवते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आवळा समाविष्ट करू शकता.
आवळ्यामध्ये असलेले ‘व्हिटॅमिन सी’ शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या लोकांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते. यासोबतच आवळा शारीरिक ऊर्जा सुधारण्यासाठी देखील ओळखला जातो. ज्यांना केसांशी संबंधित समस्या आहेत ते आपल्या आहारात आवळा समाविष्ट करू शकतात. आवळाच्या वापराने केस मजबूत तर होतातच पण केसगळती रोखण्यासाठीही ते उपयुक्त ठरू शकते.