Health News : हळद ही अधिक गुणकारी आहे. उतारवयात हळद मिसळलेले पाणी दररोज सकाळी प्यायल्याने फायद्याचे ठरते. हळदीच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. दररोज सकाळी साधारण ग्लासभर पाणी प्यावे. ते गरम करावे आणि कोमट झाल्यावर त्यात अर्धा चमचा हळद मिसळावी. हे पाणी थंड झाल्यावर प्यावे त्याचे अनेक फायदे होतात.
हळद पाण्यात मिसळून प्यावी किंवा आहारात तिचा समावेश अवश्य होईल याची दक्षता घ्यावी. दूध आणि हळद पिण्याचे अनेक फायदे आहेत. हळदीच्या पाण्यामुळे बसलेला घसा मोकळा होतो. घशाला संसर्ग झाला असेल तर हळद आणि दूध गुणकारी ठरते. खोकला आल्यावर तर हळद आणि दूध घेतले जातेच. ते घेतल्यावर दुसरे कसलेही औषध घेण्याची गरज नाही असे मानतात. हळद ही जंतूनाशक असते. त्यामुळे ती अनेक रोगांचा सामना करण्यास उपयोगी पडते.
वजन कमी होण्यास मदत
काही लोक हळदीचा चहा तयार करतात. तो तयार करण्याची पद्धत आहे. कपभर पाण्यात चमचाभर हळद टाकून हे मिश्रण उकळा. नंतर त्याला खाली उतरवून त्यात थोडा मध टाका. त्याशिवाय त्यात थोडे लिंबू पिळा किंवा त्यात संत्र्याचा रस मिसळा. त्यामुळे या मिश्रणाला चांगली चव येईल. असा हा चहा प्याल्याने वजन कमी होण्यास मदत होते.