Beauty Tips – मीठ आहरात चव वाढवण्याचं काम करत नाही तर सौंदर्य (Beauty Tips) खुलवण्यासाठीही मीठ अत्यंत फायदेशीर आहे. जाणून घ्या मिठाचे सौंदर्यवर्धक फायदे आणि त्याचा कसा वापर करावा याविषयी माहिती –
मुलायम आणि मऊ त्वचा…
२ चमचे मिठामध्ये ४ चमचे ऑरगॅनिक मध घाला आणि पेस्ट बनवा. ती पेस्ट त्वचेवर लावा. १०-१५ मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचा मुलायम आणि मऊ बनते.
डेडस्कीन हटविण्यासाठी मिठाचा स्क्रब म्हणून करा वापर…
डेडस्कीनमुळे चेहरा निस्तेज दिसतो. चेहऱ्यावरील डेडस्कीन हटविण्यासाठी मिठाचा स्क्रब म्हणून वापर करावा. ऑलिव्ह ऑइलमध्ये मीठ घालून पेस्ट बनवा. आणि या पेस्टने त्वचेवर गोलाकार मसाज करा. ५ मिनिटांनी धुवून टाका.
किंवा मीठात ऑलिव्ह ऑईल, लव्हेंडर ऑईल, बदाम तेल घालून चेहऱ्यावर स्क्रब करा. यामुळेही डेडस्कीन निघून जाण्यास मदत होते.
चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी…
१०० मिली पाण्यात फक्त १ चमचा समुद्री मीठ मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून ठेवा. उन्हातून घरी आल्यावर, त्वचा निस्तेज झाली आहे असं वाटलं तर चेहऱ्यावर हे मिश्रण स्प्रे करा. उन्हाळ्यात त्वचेवर मृत पेशी साचून राहण्याचं प्रमाण अधिक असतं. अशावेळेस डेड स्कीनचा थर नैसर्गिकरित्या हटवण्यासाठी मीठ अत्यंत फायदेशीर आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
आरोग्य : गुलाबाच्या पाकळ्यांचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घ्या
ब्युटी टिप्स : फाउंडेशननंतर त्वचा निस्तेज, काळी दिसते, तर जाणून घ्या मेकअपचा योग्य मार्ग