Beauty Tips | अनेकांना उन्हाळ्यात अंडरआर्म्सची त्वचा टॅन होण्याची समस्या निर्माण होते. या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्वचेच्या समस्या आणखी वाढू शकतात. त्यामुळे वेळीच उपाय करणे आवश्यक आहे.
जाणून घ्या अंडरआर्म्सच्या त्वचेचे टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय –
१. त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस फायदेशीर आहे. बटाट्याचा रस अंडरआर्म्सवर लावल्याने काळेपणाची समस्या दूर होते. मात्र हा उपाय नियमितपणे करावा.
२. ओट्स आणि मधही त्वचेचे टॅनिंग घालवते. ओट्स मधात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण अंडरआर्म्सवर स्क्रब करा. काही वेळाने ते स्वच्छ धुवा.
३. लिंबू आणि मध एकत्र मिसळा. त्यानंतर हे मिश्रण ५ मिनिटे अंडरआर्म्सवर राहू द्या. नंतर थंड पाण्याने ते धुवा. याच्या नियमित प्रयोगाने नक्कीच फरक जाणवेल.
४. त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबू खूपच फायदेशीर आहे. ३ चमचे लिंबाचा रस घ्या. त्यात थोडी साखर मिसळा. नंतर ते अंडरआर्म्सवर लावा आणि ५ मिनिटे मसाज करा.
५. अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि दह्याचा पॅक हळद घालून लावा. १० मिनिटांनंतर पाण्याने धुवा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health Tips | लहान मुलांना दुधासोबत ‘हे’ पदार्थ खायला देणे टाळावे
Health Care | थकवा,अशक्तपणा कमी करण्यासाठी खा खजूर, जाणून घ्या खजूर खाण्याचे फायदे
Health : त्वचा आणि केसांच्या समस्येवर टी ट्री ऑईल प्रभावी, जाणून घ्या टी ट्री ऑईलचे फायदे