पुणे : Beauty Tips – सुंदर, रुबाबदार आणि स्टायलिश दाढी दिसण्यासाठी खालील दिलेल्या टिप्स फॉलो करा. Beauty Tips
१. दालचिनी हा घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. दालचिनी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून मिश्रण बनवा. त्यानंतर हे मिश्रण दाढीवर लावा. तसेच तुम्ही दालचीनी गरम पाण्यात टाकून त्यात मिसळून सकाळी पिऊ शकता.
२. पालक हे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. पालक केसांना ऑक्सीजन पोहोचवण्याचं काम करते. आहारामध्ये पालक भाजीचा समावेश करावा. तसेच नियमितपणे पालक ज्यूस प्यावे.
३. चेहऱ्याला नियमितपणे १०-१५ मिनिटे आवळ्याच्या तेलाने मसाज करा.
४. खोबऱ्याच्या तेलाने केसांची चांगली वाढ होते. त्यामुळे आहारात खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. तसेच खोबऱ्याच्या तेलाने रोज दाढीच्या केसांची मसाज करा. खोबऱ्याच्या तेलात ५-६ कढिपत्त्याची पाने टाकून ते गरम करा. त्यानंतर या तेलाने दाढीला मसाज करा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा धुवा.
५. भोपळ्याच्या बिया या केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. भोपळ्याच्या बिया सुकवून खा. या बियांच्या सेवनाने दाढीच्या केसांची चांगली वाढ होते.
६ आहारामध्ये गाजर ज्युसचा समावेश करा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा:
Beauty Tips : मुलायम आणि चमकदार त्वचा बनविण्यासाठी गुलाब फायदेशीर, जाणून घ्या कसा करावा वापर…!
Beauty Tips : त्वचेच्या सौंदर्य वृद्धीसाठी मीठ उपयोगी, जाणून घ्या कसा करावा वापर…!
Beauty Tips : अभिनेत्री कैटरीना कैफचा ”फिटनेस मंत्र” जाणून घ्या…!