सध्या मधुमेह असो वा रक्तदाब ही समस्या फक्त वयोवृद्धांनाच नाहीतर अगदी तरुणांना देखील सतावत असते. मधुमेहाबाबत खाण्यामध्ये थोडासा निष्काळजीपणा देखील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे लक्षात आल्यास योग्य खाणे आणि खबरदारी घेतल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.
मधुमेहात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. मधुमेहाच्या रुग्णांनी मांसाहार टाळावा. कारण तो पचण्यास जड असतो. त्यामुळे शरीरातील चयापचय मंदावतो आणि साखरेची पातळी वाढू शकते. काही भाज्या खाणेही टाळावे. आर्बी, जिमीकंद, रताळे, बटाटा, फणस यांसारख्या भाज्या खूप-कमी किंवा अजिबात खाऊ नये, कारण त्यात नैसर्गिक साखर असते. मधुमेहात ड्रायफ्रुट्स खाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
तसेच आंबा, केळी, चेरी द्राक्षे आणि अननस यांसारख्या फळांमध्येही भरपूर नैसर्गिक साखर असते. त्यामुळे ही फळे खाणं टाळावं. हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांमध्ये याचा समावेश केला जातो, म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते धोकादायक आहे.