शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची असते. मेंदूच्या कार्यासाठी, ऍथलेटिक कामगिरीसाठी, मूड सुधारण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगली झोप आवश्यक असते. पण घरातील काम असो किंवा ऑफिसमधील काम याने ताणतणाव हा येत असतो. मात्र, झोपेसंबंधित काही बाबी आहेत त्या जर तुमच्यात असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपल्या सर्वांना माहित आहे की, रात्री सात तासांपेक्षा कमी झोप आपल्याला चिडचिड करू शकते आणि झोपेची कमतरता अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे पुरेशी झोप मिळेल, याला प्राधान्य द्या. शरीरातील प्राथमिक ताण संप्रेरक, कोर्टिसोलची उच्च पातळी यासाठी जबाबदार असू शकते. कोर्टिसोल वाढल्याने वजन वाढणे, उच्च रक्तदाब, स्नायू कमी होणे, मूड बदलणे, मधुमेहाचा धोका वाढणे आणि झोपेच्या समस्या होऊ शकतात.
तसेच कमी कॅफीन, ताण व्यवस्थापन आणि सकस आहार यामुळे कोर्टिसोलची पातळी कमी होण्यास मदत होते. झोपायच्या एक तास आधी दही, पीनट बटर आणि एक केळी खाल्ल्यास चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. प्रथिनेयुक्त मिनी ब्रेकफास्ट रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो, ज्यामुळे चांगली झोप येते.