बदलती जीवनशैली, कामाचा अतिरिक्त ताण यांसारख्या गोष्टींमुळे आपल्या वागणुकीतही बदल दिसून येतो. तेव्हा मात्र प्रचंड प्रमाणात चिडचिड होते. तुम्हालाही अशा समस्या जाणवत असेल तर आम्ही तुम्हाला यातून मार्ग काढण्याचा सोपा उपाय सांगणार आहोत.
मानसिक आरोग्य सुदृढ कसं राहील याकडे लक्ष द्यावं. त्यासाठी समस्यांचा धोका कमी करण्यासाठी चांगली झोप आणि नियमित व्यायाम हे दोन प्रभावी मार्ग असू शकतात. योगासने, धावणे, पोहणे इत्यादी शारीरिक व्यायामांमुळे मेंदूमध्ये एंडोर्फिन नावाचा संप्रेरक बाहेर पडतो, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि आपल्याला आनंद होतो. याशिवाय रोज किमान 6-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. तसेच नियमित योगा-व्यायाम आणि ध्यानधारणा केल्यास या समस्येपासून आराम मिळू शकतो.
तसेच जीवनशैलीत बदल केल्यास तणाव, चिंता आणि नैराश्येसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या टाळता येऊ शकतात. तणाव आणि चिंता यांसारख्या परिस्थितीत मित्रांशी बोला, तुमच्या समस्या सांगा, यामुळे मानसिक शांती मिळते. योगाचा सराव करा, संगीत ऐका, ध्यान करा. संतुलित आहार देखील लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतो.