थकवा, अशक्तपणा हा अतिरिक्त काम केल्याने जाणवणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, सारखंच जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल हे तुम्ही समजून घ्यावे. त्यासाठी आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन मिळेल, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असू शकते. या कमतरतेमुळे शरीराची कार्यक्षमता कमी होते तेव्हा थकवा जाणवतो. अशावेळी व्हिटॅमिन डी घ्यावे लागते. यासोबतच ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे तणाव, मूड बदलणे आणि नैराश्य यांसारखी समस्या उद्भवू शकते. शरीराची ही स्थिती व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे उद्भवू शकते. तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि झोप येत असेल तर हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षण आहे. यामुळे स्नायू दुखणे, थकवा, अशक्तपणा येतो.
त्यामुळे अशी काही लक्षणे दिसल्यास आपल्या आहारात संपूर्ण धान्य, अंडी, मासे, चीज आणि दूध यांसारखे व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ खावेत. जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. मॅग्नेशियम मज्जासंस्थेचे नियमन करते आणि मनाला आराम देऊन रात्री चांगली झोप घेण्यास मदत करते.
जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर तुमच्या झोपेवर नक्कीच परिणाम होतो. यासाठी पालकाचा रस आणि सूप रोज सेवन करावे. जर तुम्हाला तुमच्या स्नायूंमध्ये वेदना आणि थकवा जाणवत असेल तर हे तुमच्या शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेचे लक्षण आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.