कामाचा ताण असो वा अंगमेहनतीची कामं शरीराला काही टप्प्यानंतर थकवा हा जाणवत असतोच. तुम्हालाही सारखं थकल्यासारखं वाटत असेल तर काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यासाठी दररोज व्यायाम करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.
तणाव आणि नैराश्येपासून दूर राहणे आणि आपले शरीर हायड्रेटेड ठेवणे, आपण आपल्या शरीरातील कमजोरी टाळू शकतो. याशिवाय, आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यात अंडी फायद्याच्या ठरू शकतील. कारण, अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. याशिवाय यामध्ये इतरही अनेक पोषक घटक असतात.
अंड्यामुळे शरीराला मिळते ऊर्जा
प्रथिने स्नायू आणि शरीराच्या ऊतींचा विकास आणि वाढ करतात. याशिवाय अंड्याचा आहारात समावेश केल्यास त्वरित ऊर्जा मिळते. अंड्यांमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात आणि म्हणूनच थकवा दूर करण्यासाठी ते सर्वोत्तम अन्न मानले जाते.
पालेभाज्यांमध्ये असतात अनेक पोषक घटक
पालक, हिरव्या भाज्यांसारख्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीन असतात जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि के तसेच बीटा कॅरोटीन, फोलेट आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात, म्हणून ते शक्तिशाली प्रतिकारशक्ती वाढवणारे देखील आहेत.
‘व्हिटॅमिन सी’ने समृद्ध पदार्थांचा आहारात करा समावेश
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ने समृद्ध असलेल्या लिंबूवर्गीय फळांचे अधिकाधिक सेवन करावे. व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडेंट आहे जो पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतो.