अशक्तपणा असो किंवा इतर कोणतंही कारण सर्वात पहिलं लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. या लिंबू पाण्यामुळे शरीरात शक्ती आणि ऊर्जा टिकून राहते. इतकेच नाहीतर लिंबू पाणी तुमचं वाढलेलं वजनही कमी करण्यास फायदेशीर ठरते. त्वचा संबंधीचे विकारही दूर होतात. यांसह इतर अनेक फायदे आहेत.
लिंबू पाण्याने विटामिन्स सी शरीराला मिळते. तसेच शरीराला डीटॉक्स करण्यासही हातभार लागतो. लिंबू पाण्यात अँटीऑक्सिडेंट गुण आढळत असल्याने शरीराला फायदा होतो. दररोज नियमित काळे मीठ घालून लिंबू पाणी प्यायल्यास पोट चांगले साफ होण्यास मदत होते. यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील फायदा होतो. खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्याने अनेकांना अपचनाचा त्रास होत असतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण उपाशी पोटी रोज लिंबू पाणी, काळे मीठ घालून प्यायल्यास खूप फायदा होतो. यामुळे गॅसेसची समस्या दूर होते.
लिंबू पाणी रोज प्यायल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. या गंभीर आजारात लिंबू पाण्याचा खूपच लाभ होत असतो. माणसाचे पोट साफ झाले आणि वजन कमी झाले तर 90 टक्के आजार बरे होतात. लिंबू पाण्याने हे सर्व शक्य होत असल्याने अनेक आजारापासून दूर राहता येऊ शकते. लिंबू पाण्यात काळे मीठ (सैंधव मीठ) टाकून प्यायल्याने पोटॅशियम, विटामिन्स सी आणि सोडियम असे घटक मिळतात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार होण्यास मदत मिळते.