पुणे प्राईम न्यूज डेस्क: चांगलं आरोग्य मिळावं यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहात. त्यानुसार, आहाराकडेही विशेष लक्ष दिले जाते. असे असताना आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश असणे गरजेचे बनले आहे. डॉक्टरांकडूनही वेळोवेळी असा सल्लाही दिला जातो. कारण या पालेभाज्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वांसह खनिजांचा जणू साठाच असतो.
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. रोजच्या आहारात जर तुम्ही हिरव्या भाज्यांचा समावेश केलात तर तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरीज् मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेट देखील कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यातील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे आपले हृदय आणि डोळ्यांनादेखील फायदा होतो.
शेपू, पालक, मेथी, चवळी अशा अनेक भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आढळतात. आपल्या डॉक्टरही हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणास ठेवण्यासाठीही मदत करत असते. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.