सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाही. परिणामी, अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. या ताणतणावावर वेळीच लक्ष दिले नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यातच एक अशी वस्तू आहे त्याने तुमचा ताणतणाव कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. तो म्हणजे स्ट्रेस बॉल.
सतत एकच विचार, चिंता मनात येत असेल, त्याचाच विचार केला जात असेल तर आपल्यावरील तणाव वाढू लागतो. अशा वेळी स्ट्रेस बॉल आपले लक्ष विचलित करण्याचे काम करतात. चिंता वाटणाऱ्या गोष्टींपासून दूर करत ध्यान एकाग्र करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी मदत करतात. स्ट्रेस बॉलचा असा वापर केल्यास व्यक्तीची उत्पादकताही वाढते.
स्ट्रेस बॉलच्या वापराने फक्त मनगट किंवा हाताच्या आसपासच्या स्नायूंनाच व्यायाम होतो असे नाही. तर अनेक प्रकारे व्यायाम होतो. शरीरातील प्रत्येक रक्तवाहिनी दुसऱ्या रक्तवाहिनीशी जोडलेली असल्याने स्ट्रेस बॉलचा व्यायाम केल्याने संपूर्ण शरीरातील नसा उत्तेजित होतात. त्यामुळे संपूर्ण शरीरालाच व्यायाम होतो.
हात, मनगट तसेच आसपास असणाऱ्या नसा या थेट मेंदूशी जोडलेल्या असतात. आपण जेव्हा स्ट्रेस बॉलवर दबाव टाकतो, तेव्हा त्या नसा आणि स्नायू उत्तेजित होतात आणि आकुंचन पावतात. त्यामुळे त्यांची शक्ती वाढते किंवा त्या मजबूत होतात. यामुळे मज्जासंस्थेच्या कार्यात सुधारणा होते आणि तणावाचे नियंत्रण होण्यास मदत होते.