आपण निरोगी राहावं यासाठी अनेकजण विशेष पद्धतीने काळजी घेत असतात. तरीदेखील काहीना काहीतरी समस्याही उद्भवत असते. त्यात वयाच्या ठराविक कालावधीत हाडे ठिसूळपणा यांसारखी समस्या उद्भवू शकते. त्यात हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. हाडांच्या आरोग्यासाठी योग्य आहार गरजेचा असतो.
आपल्या हाडांतील अल्प प्रमाणातील कॅल्शियम शरीर नियमित बाहेर टाकत असते व त्या जागी नवे कॅल्शियम घेते. मात्र, शरीर नवे कॅल्शियम शोषून घेण्याच्या प्रमाणात ते जास्त प्रमाणात उत्सर्जित करू लागले. त्यात मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थाचे अतिसेवन करू नये. पॅकबंद व अन्नपदार्थ टिकाऊ राहण्यासाठीचे घटक वापरलेले पदार्थ फार न खाता पौष्टिक ताजे अन्न घ्यावे.
नियमित हालचाली व व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. आपल्या जीवनसत्त्वांचा स्तर नियमित तपासावा. रोज येणाऱ्या तणावाचे योग्य व्यवस्थापन करावे. अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्टता आदी विकारांकडे दुर्लक्ष न करता त्यावर सुयोग्य व उपचार करून निरोगी राहावे.