पुणे : मार्डला प्रशासनाकडून शनिवारपर्यंत चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. सुमारे पाच हजार निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी मार्डने आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवताना संपावर जाण्याचा इशारा दिला होता. एक जानेवारी पर्यंत सरकारने मागण्यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केले होती. मात्र, त्यांच्या मागणीला प्रशासनाने दाद दिली नाही.
अनेक ठिकाणी निवासी डॉक्टरांची संख्या कमी असल्याने उपलब्ध डॉक्टरांवर कामाचा अधिकचा ताण येत आहे. सरकारला याबाबात सांगण्यात आले होते, मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संपात निवासी डॉक्टर सहभागी होणार असलयाने जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्णांचे हाल होण्याची श्यकता आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद ठेवण्याच्या इशारा मार्डच्या वतीने देण्यात आला आहे.