पुणे : सध्या चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे. यामुळे केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. दोन दिवसांपासून विमानतळावर प्रवाशांची रॅन्डम कोरोना चाचणी केली जात आहे. याचे कारण म्हणजे मागील दोन दिवसांत परदेशातून आलेल्या ३९ प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे.
यामुळे यंत्रणा सावध झाली आहे. केंद्र सरकारकडून विमान प्रवासासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.
३९ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुणे तपासासाठी लॅबमध्ये पाठण्यात आले आहेत. कोरोनाच्या बीएफ ७ व्हेरियंटमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
दरम्यान, बीएफ ७ व्हेरियंटमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारतामध्येही खबरदारी घेतली जात आहे. देशात देखील काही राज्यात मास्क सक्ती केली आहे. यामुळे आता आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.