राहुलकुमार अवचट
यवत : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यवत येथे हरितवारी फाउंडेशन व अक्षय ब्लड बँक, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री काळभैरवनाथ मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २४२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला आहे.
शिबिराची सुरुवात स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. पण तिला अन्नदान आणि शेवटच्या क्षणाला रक्तदान हेच पुण्यदान या ब्रीदवाक्य बाळगून
सकाळपासूनच रक्तदात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. अनेकांना रक्तदान करण्यासाठी वाट पहावी लागत होती. रक्तदानासाठी पुरुषांबरोबरच महिलांनी देखील उत्स्फूर्त दिला.
यावेळी २४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदास त्याच हरितवारी फाउंडेशन व अक्षय ब्लड बँक यांच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले “हरितवारी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास सर्व रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल व रक्तदान शिबिरास सहकार्य केल्याबद्दल अक्षय ब्लड बँक , सर्व पदाधिकारी व स्टाफ या सर्वांचे हरितवारी फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले
शिवरायांना केवळ मानवंदना किंवा हार अर्पण करून आपले काम संपत नाही तर ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडवले त्यांचा स्वाभिमान आणि अभिमान उराशी बाळगून यवत येथील हरितवारी फाउंडेशनने रक्तदान शिबीर हा उपक्रम राबविला होता. हरितवारी फाउंडेशन च्या वतीने यवत परिसर व दौंड तालुक्यातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम याबरोबरच रक्तदान शिबिरासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये असणाऱ्या जनसामान्यांच्या काबाडकष्ट करून जगणाऱ्या लोकांसाठी ज्यांचा कोणीच आज वाली नाही अशा लोकांसाठी रक्तदान करून त्यांना जीवन द्यावे. कारण या धावपळीच्या जीवनात व कॉम्प्युटरच्या युगात सर्व प्रकारच्या कारखाने निर्माण झाले आहेत.
परंतु जगाच्या पाठीवर कुठेही रक्ताचा कारखाना निर्माण झाला नाही आणि निर्माण होणार नाही म्हणूनच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला रक्तदान करून जीवनदान द्यावे असे आवाहन हरितवारी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.