पुणे : जगभरात अशी अनेक झाडे आहेत त्याचे गुणधर्म, फायदे वेगवेगळे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का असे एक फळ आहे, ज्यामध्ये कोणत्याही आंबट पदार्थाचे गोड पदार्थात रूपांतर करण्याची क्षमता असते. असे एक फळ आहे ज्याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, त्याचं नाव आहे मिरॅकल फ्रूट…
शास्त्रज्ञांना या फळामध्ये मिरॅक्युलिन नावाचा घटक सापडला, जो ग्लायकोप्रोटीनचा एक प्रकार आहे. तो खाताच त्याचा तुमच्या चवींवर चांगला परिणाम होतो. जेवणाच्या चवीतील फरक आपण पाहू शकतो. यासाठी तुम्ही जरी लिंबू खाल्ले किंवा व्हिनेगर प्यायले असले तरी हे फळ खाल्ल्यानंतर 60 मिनिटांत सर्वकाही खूप गोड वाटू लागते.
आपण काही आंबट खातो तेव्हा त्यातील pH मिरॅक्युलिन आपल्या जिभेवर राहतो. त्यामुळे जिभेला गोड वाटत नाही. पण जेव्हा pH पातळी कमी होते तेव्हा ते गोड वाटू लागते. हे प्रथिन सक्रिय झाल्यावर असे हे होत जाते. मिरॅक्युलिन प्रोटीन जास्त असते तेव्हा तुम्ही कितीही आंबट खाल्ले तरी त्याची चव गोड लागते. जर तुम्ही हे फळ खाल्ले तर तुम्हाला एक तासभर सर्वकाही गोड वाटेल. हे आहारासाठी खूप चांगले मानले जाते.
आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. नायजेरियामध्ये या फळाचा वापर मधुमेह आणि अस्थमासारख्या आजारांवर उपचारासाठी केला जातो. याशिवाय कर्करोगावरील उपचारासाठीही या फळाचा उपयोग होतो.