पुणे : अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांना पुत्ररत्न झाला आहे. ही गुड न्यूज आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. बाळाच्या येण्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी झाले आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी यामीने बाळाला जन्म दिला आहे. आदित्य आणि यामी यांनी त्यांच्या मुलाचे नाव वेव्दिद असं ठेवले आहे. यावेळी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून आदित्यने बाळ झाल्याचा आनंद व्यक्त केला असून यामीवर उपचार करणा-या डॉक्टर्सचे त्याने आभार मानले.
यामी आणि आदित्य हे आई-वडील झाल्याबद्दल त्यांचे चाहते अभिनंदन करत आहेत. बॉलिवूडमधूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यामी आणि आदित्य यांनी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात यामीची भूमिका होती. तर, आदित्यने दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या दरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले. यामी आणि आदित्य हे 4 जून 2021 रोजी विवाहबंधनात अडकले. हा विवाहसोहळाही अतिशय साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला.
काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत यामी आणि आदित्य लवकरच आई-वडिल होणार असल्याची घोषणा केली होती.