पुणे : अलीकडे बॉलिवूडमधील काही चित्रपटांवर कोणत्याही कारणावरून बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. या सर्व चित्रपटांना होणारा विरोध पाहून अनेक बॉलिवूड कलाकार याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ही टि्वट करुन यावर प्रतिक्रिया दिलीआहे.
“खूप बोलावसं वाटतं, पण बोलायचं कसं? आजकाल प्रत्येक गोष्ट मोठी होऊन जाते!” अमिताभ यांचा हा निशाणा बॉलिवूडमध्ये काही जुन्या वक्तव्यांमुळे चित्रपटावर टाकला जाणार बहिष्कार याबाबत असावा असा अंदाज बांधला जात आहे. अमिताभ बच्चन यांनी हे ट्वीट केलं आहे, ज्यामधून सरळ सरळ नाही पण बॉलिवूड चित्रपटांवरील बहिष्कारावर अमिताभ यांचा निशाणा असल्याचं दिसून येत आहे.
लाल सिंह चड्ढावर बहिष्कार टाकणारे ट्रोलर्स आता अमिताभ बच्चनच्या ब्रह्मास्त्र चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. या चित्रपटामध्ये रणवीर मंदिरात जाताना बुट घालून जात असल्याचे दिसत आहे. या कारणावरून देखील अनेकांनी त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.
सोशल मीडियावर काही दिवसांपासून एकानंतर एक बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. कलाकारांनी केलेल्या काही वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त विधानांवरही आता विरोध केला जात आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या बहिष्काराचे जिवंत उदाहरण म्हणजे आमीर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपट आहे.