चंदीगड : चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतला कानाखाली मारल्याची बातमी समोर येत आहे. कथितरित्या एका सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबलने तिला कानाखाली मारली. कंगना चंदीगडहून दिल्लीला येत होती. विमानतळावर फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी चेकिंग दरम्यान तिला कुलविंदर कौर नावाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने कानाखाली मारली आहे. त्या सीआयएसएफच्या महिला कर्मचा-याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर तिला निलंबित करण्यात आले आहे.
कोण आहे CISF जवान कुलविंदर कौर ?
CISF जवान कुलविंदर कौर या 15 वर्षापासून सीआयएसएफमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत तिची जबाबदारी चोख पार पाडत आहे. कुलविंदर कौर चा नवराही सीआयएसएफचा जवान आहे. कुलविंदर कौर यांना दोन मुले आहे. ती गेल्या दोन वर्षापासून चंदीगड विमानतळावर तैनात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलविंदर कौर ही पंजाबमधील सुल्तानपुर लोधी येथील रहिवासी आहे. ती सध्या मोहालीच्या फेज एक्समध्ये सेक्टर 64 मध्ये राहते. तिचे कुटुंब शेतकरी चळवळीशी जोडले गेले आहे. सध्या कुलविंदर चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अंतर्गत सुरक्षेत तैनात होती.
कंगनाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीनंतर ती बोर्डिगसाठी जात असताना एलसीटी कुलविंदर कौर हिने तिच्या कानाखाली मारली. त्यानंतर कंगना राणावतसोबत प्रवास करणा-या मयंक मधुरने कुलविंदर कौरला कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी सीआयएसएफ जवानांना ताब्यात घेण्यात आले आहे.
CISF जवान कुलविंदर कौरने कंगना राणावतच्या कानाखाली मारली आणि शिवीगाळ केल्याचे कारण सांगितले की, शेतकरी आंदोलनाची ती समर्थक आहे, पण मला काळजी याची वाटतेय की, पंजाबमध्ये जो दहशतवाद वाढतो आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार आहात?