विलासराव सहकार कारखान्यात दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुख विडिलांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. विलासराव देशमुख यांच्या राजकीय वाटचालीबाबत केलेल्या वर्कव्यामुळे नेटकऱ्यांकडून रितेश देशमुख याला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. नेटकऱ्यांनाही रितेशनं जशाच तसं उत्तर दिलं आहे.
विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचं त्यांच्या मनातही आलं नाही, असं रितेश देशमुखने म्हटलं होतं. त्याच्या याच विधानावर ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आली आहे. पण या टीकेला रितेशने देखील त्याच भाषेत उत्तर दिलं आहे.
रितेशने नेमकं काय म्हटलं?
विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणूकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, अशा आशयाची पोस्ट करण्यात आली आहे. त्यावर उत्तर देताना रितेशने त्यांना म्हटलं की, हे साफ खोटं आहे, तुम्ही जा आणि आधी खरं काय आहे ते तपासा. रितेशच्या या उत्तरवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. पण रितेशच्या या उत्तवर नेटकऱ्यांनी पुन्हा टीका केली. स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यात काहीच चुकीचं नाही, पण ही गोष्टी नाकारली का जातेय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारलाय. यावर आता रितेश काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.