Vicky Kaushal : पुणे : मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्कात दीपोत्सावाचे आयोजन केले जाते. त्या दरम्यानच विकी कौशलच्या आगामी सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. या दीपोत्सवाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतात. यंदा विकी कौशल, राजकुमार हिराणी, अभिजीत जोशी, साजिद नाडियादवाला, आशुतोष गोवारीकर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
सिनेमासाठी तगडी स्टारकास्ट
विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. ‘छावा’ असे या सिनेमाचे नाव असल्याचं म्हटलं जात आहे.विकी कौशलसह या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
विकी कौशलच्या लूकचं कौतुक
दीपोत्सवात राज ठाकरेंनी सिनेमातील विकीच्या लूकचे कौतूक केले. ते म्हणाले,”विकी कौशलचा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विकी कौशल धर्मवीर संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तो खूप मेहनत घेत असून त्याने खरीखुरी दाढी वाढवली आहे”.
‘सॅम बहादुर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
विकी कौशल सध्या ‘सॅम बहादुर’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. 1 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर आणि पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षकांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे. विकीचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा सिनेमादेखील 22 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.