मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (वय – ६५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे ‘मोरुची मावशी’ हे नाटक रंगभूमीवरील प्रचंड गाजले आहे. पटवर्धन यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला ठसा उमटवला आहे.
दरम्यान, मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.