मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतून ज्येष्ठ चित्रपट आणि टीव्ही अभिनेते अरुण बाली (वय- ७९) यांचे आज शुक्रवारी (ता.७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अरुण बाली हे अनेक दिवसांपासून आजारी होते. ते मायस्थेनिया ग्रॅव्हिस या न्यूरोमस्क्युलर आजाराशी झुंज देत होते. त्यांनी आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांना हिरानंदानी रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
अरुण बाली यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘सौगंध’, ‘यलगार’, ‘राजू बन गया जेंटलमैन’, ‘खलनायक’, ‘राम जाने’, ‘पुलिसवाला गुंडा’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’, ‘सत्या’, ‘शिकारी’, ‘हे राम’, ‘आंखें’, ‘जमीन’, ‘अरमान’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘3 इडियट्स’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘पीके’, ‘एयरलिफ्ट’, ‘बागी’, ‘केदारनाथ’, ‘पानीपत’ और ‘लाल सिंह चड्ढा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
तर ‘नीम का पेड़’, ‘दस्तूर’, ‘चाणक्य’, ‘देख भाई देख’, ‘द ग्रेट मराठा’, ‘शक्तिमान’, ‘स्वाभिमान’, ‘देस में निकला होगा चांद’, ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’, ‘वो रहने वाली महलों की’ आणि ‘देवों के देव महादेव’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही सीरियलमध्ये काम केले आहे.