पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी आणि तिने गायलेली अजरामर गीते आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात. अशी गोड गळ्याची गायिका वैशाली माडेचं महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेले नवीन गीत रसिकांच्या भेटीला लवकरच येत आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली लावणी आणि शेकडो वर्षांची परंपरा जोपासत रसिकांचं मनोरंजन लावणीने केले आहे. वैशाली माडे यांनी लावणीतून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. असा अनोखा प्रयोग लावणीतून पहिल्यांदाच होत आहे. “तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायच नाय, जय भीम वाल्याच्या नादी लागायच नाय” असे या लावणीचे बोल आहेत.
या बहारदार लावणीला संगीतकार विशाल जाधव यांनी संगीत दिले असून गीतकार देखील तेच आहेत. तर ही लावणी वैशाली माडे यांच्या आवाजात स्वरबद्ध केली आहे. तर मेघा घाडगे यांच्यावर ही लावणी चित्रित करण्यात आली आहे. माडे या म्हणाल्या की, असा हा प्रयोग पहिल्यांदाच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हे गीत करताना वेगळाच आनंद होत आहे.
वैशाली माडे यांनी या अगोदर ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे गीत गाजले होते. या गाण्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आहे होते. तसेच त्यांनी ‘कलंक’ या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं गायले होते. याच बरोबर मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिका अनेक अल्बम यांसाठी त्यांनी गीते गायली असून ती लोकप्रिय झाली आहेत.