Useful Tips : उन्हाळ्यात मोबाईलचा स्फोट झाल्याच्या बऱ्याच घटना घडतात. बहुतांशी मोबाईलची हाताळणी यासाठी कारणीभूत ठरते. जाणून घ्या उन्हाळ्यात मोबाइलचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी – ?(Avoid ‘these’ mistakes while using mobile in summer, otherwise the mobile will explode)
पहा मोबाइलचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी
लोकल चार्जर वापरू नये
मोबाईल चार्जिंगसाठी लोकल चार्जर वापरल्याने बॅटरीवर दबाव पडतो, त्यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो. हे टाळण्यासाठी चार्जिंग करताना ओरिजनल चार्जर वापरावा. (Useful Tips)
फोन वापराचा अतिरेक
कधीकधी फोन गरम झाला आहे असे आपल्याला जाणवते, गरम फोन जास्त वेळ वापरल्यामुळेपण यामुळे फोनचा स्फोट देखील होऊ शकतो.
रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावणे
रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावल्यास स्मार्टफोनचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते.
मोबाईल थेट उन्हाच्या संपर्कात येऊ देऊ नये
उन्हात प्रवास करताना मोबाईल थेट उन्हाच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घ्या. कार चालवताना डॅशबोर्डवर स्मार्टफोन ठेऊ नका.
जास्त हेवी गेम खेळणे
मोबाईलच्या क्षमतेपेक्षा जास्त हेवी गेम सतत खेळल्याने प्रोसेसर अधिक वेगाने काम करू लागतो. त्यामुळे फोन गरम होउन त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.
योग्य ठिकाणी ठेवावा
उन्हाळ्यात जास्त वेळ फोन न वापरता एखाद्या लेदर बॅगमध्ये खूप वेळ ठेवला तर त्याचा स्फोट होउ शकतो.
प्रोसेसर नीट काम करत नसेल तर
काही महिन्यांपर्यंत फोन अपडेट केला नाही तर त्यामधील प्रोसेसर नीट काम करत नाही. (Useful Tips) जर प्रोसेसर नीट काम करत नसेल तर फोन सतत गरम व्हायला सुरूवात होते, ज्यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी फोनला अपडेट करत जा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Beauty Tips : रुबाबदार आणि स्टायलिश दाढी दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स…!
Health News : ओम उच्चारण केल्याने शरीराला होतात अनेक फायदे, जाणून घ्या…!
Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे…!