मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उर्मिला मातोंडकरने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
एका रिपोर्टनुसार उर्मिला मातोंडकर हिनं घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. लग्नाचं नातं संपण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तिनं सुरू केली आहे. दोघांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी, हा घटस्फोट दोघांच्या सहमतीनं होत नसल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान, यासंदर्भातह दोघांनी अधिकृत माहिती दिली नाहीये.
दरम्यान, उर्मिलाने मोहसीन अख्तर मीरसोबत 4 फेब्रुवारी 2016 रोजी लग्नगाठ बांधली होती. डिझायनर मनीष मल्होत्रामुळे दोघांचीही ओळख झाली होती. मनीष दोघांचाही कॉमन फ्रेंड आहे. हे लग्न फक्त आंतरधर्मामुळे नाही तर वयामुळे देखील तितकंच चर्चेत होतं. उर्मिला मातोंडकर मोहसिनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.