मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लेक शनेल लग्न बंधनात अडकली आहे. कॅनडा स्थित असलेल्या अर्जुन भल्ला सोबत स्मृती इराणी यांची लेक लग्न बंधनात अडकली आहे. हा लग्न सोहळा थाटात राजस्थान येथील नागौर येथे पार पडला. या लग्नाला केवळ मोजकीच मंडळी उपस्थित होते.
स्मृती इराणी देखील आपल्या लेकीच्या लग्नात खूपच आनंदी दिसत होत्या. यावेळी त्यांनी ठेका देखील धरला. तर स्मृती इराणी यांच्या लेकीच्या लग्नात केवळ कुटुंबातील सदस्य जवळचे मित्र असे ५० पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले होते.
या लग्न सोहळ्याला राजस्थानी संस्कृती ही थीम देखील ठेवण्यात आली होती. यांच्या लग्न सोहळ्यात राजस्थानी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली.
यांच्या लग्नाचे सोशल मीडियावर फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होताना दिसत आहेत.