पुणे प्राईम न्यूज: मराठी इंदूस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित गेल्या दोन दिवसांपासून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. टोल दर वाढीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोबतच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील याबद्दल आवाज उठवला आहे. तेजस्विनीने केलेल्या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. आता तिच्या या ट्वीटनंतर तिचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आल्याचे मिळत आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काढण्यात आलं आहे. यासंदर्भात ट्वीट करत अभिनेत्रीने आपलं म्हणणं मांडलं आहे. तेजस्विनीने ट्वीट केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,”कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?”.
#महाराष्ट्र #टोलधाड #लोकशाही_धाब्यावर #NoDemocracy #MaharashtraPolitics pic.twitter.com/Y5UHyIVO6S
— TEJASWWINI (@tejaswwini) October 10, 2023
तेजस्विनीने पुढे लिहिलं आहे,” ट्विटर अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणे, हा त्याहून मोठा बहुमान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण, असल्या गोष्टींमुळे माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्य जनतेचा आवाज बंद करणे हाच यांचा बहुदा एकमात्र ‘एक्स”‘ फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र!”. असं देखील तेजस्वीने म्हटले आहे.
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6— TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023
तेजस्विनीने काय ट्वीट केलं होतं?
तेजस्विनी पंडितने आपल्या ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांचा टोलबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये फडणवीस म्हणत होते,”शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती, त्यानुसार आता राज्यातील सर्व टोल नाक्यांवर आम्ही हलक्या वाहनांना टोल मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रात फक्त आपण कमर्शियल आणि मोठ्या गाड्यांचे टोल घेतो”.
हा तेजस्विनीने व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं होतं,”म्हणजे? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून”.