मुंबई : सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या शो बिग बॉस या शोचे १८ वे पर्वाचा नुकताच शेवट झाला. आता १८ व्या बिग बॉस शोच्या पर्वाला विजेता मिळाला आहे. अभिनेता करणवीर मेहरा या बिग बॉस १८ व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. इतर उमेदवारांपेक्षा मोठ्या फरकाने त्याने विजय मिळवला आहे.
हा शो दर्शकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. मागील काही आठवड्यापासून दर्शक मोठ्या प्रमाणावर या शो ला पसंती देत होते. कारण अंतिम निकाल जवळ येत होता. केवळ या शो चे चहातेच नाही तर अनेक सेलिब्रिटीही हा शो आवर्जून पाहतात आणि त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत असतात.
आता अशातच करणवीर मेहरा या स्पर्धक बिग बॉस शो चा विजेता ठरला आहे. त्याने ५० लाखांची प्राइज मनीही जिंकली आहे. यानंतर त्याच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
या वर्षीच्या पर्वात रजत दलालस ईशा सिंग, करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश सिंग आणि चुम दरांग हे टॉप सहा स्पर्धक होते. पाचव्या स्थानावर चुम दरांगचं नाव असून अभिनेता अविनाश मिश्रा चौथ्या स्थानावर आहे. तर रजत दलालला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोन स्पर्धकांमध्ये अतिशय चुरशीची अंतिम लढत चाहत्यांना पाहायला मिळाली आहे .