मुंबई : ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले झाला असुन या सिझनचा सूरज चव्हाण हा विजेता ठरला आहे. या संपूर्ण सीजनमध्ये ग्रामीण बाज असणाऱ्या साध्या भोळ्या सूरज चव्हाण यांने आपली भलीमोठी छाप पाडली. यानंतर आता सूरज चव्हाण याच्यावर बक्षिसांची खैरात होऊ लागली आहे. तसेच त्याला चित्रपटात कमा करण्याची ऑफर सुद्धा मिळाली आहे.
सूरजला नेमकं काय-काय मिळाले?
सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील विजेत्यामुळे १४ लाख ६० हजार रुपये मिळाले आहेत. तसेच पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये मिळाले. सोबत सूरज चव्हाण याला एक स्कूटर मिळाली आहे. तसेच एका चित्रपटाची ऑफरसुद्धा मिळाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली आहे.
बिग बॉस 5 मधील स्पर्धेक..
बिग बॉस 5 चा विजेतपदासाठी सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामध्ये स्पर्धा होती. फिनाले दरम्यान, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत टॉप 2 मध्ये राहिले. अभिजीत सावंत हा एक सुप्रसिद्ध गायक आणि इंडियन आयडॉलचा पहिला विजेता होता. त्याला सूरजने मागे टाकून विजेतेपद मिळवले आहे. अभिजित उपविजेता ठरला.
कोण आहे सूरज चव्हाण?
सूरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील असून घरच्या परिस्थितीमुळे लोकांकडे 300 रुपये मुजरीवर सूरज चव्हाण जात होता. परंतु त्याच्या नशिबात वेगळेच काही होते. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ केल. तो प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्यात तो पुढे रिलस्टार झाला आहे. आता इंस्टाग्राम प्रोमोशन आणि यूट्यूब हे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. तो अनेक ठिकाणी कार्यक्रमांच्या उदघाटन समारंभसाठी जात असतो.