Superstar Singer 3 : या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुपरस्टार सिंगर 3 च्या भावपूर्ण रजनी आयोजित केली होती. यावेळी ‘गझल नाइट’ असणार आहे. या भागात स्पर्धेतील छोटे उस्ताद यांनी गझल सम्राट पंकज उधास यांना आदरांजली वाहताना हृदयस्पर्शी गीते व गझला सादर करून आपले कौशल्य दाखविण्यात आले. यावेळी 7 वर्षीय अरिभव एस. आणि 8 वर्षीय पिहू शर्माने ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है’ गीतावर जो जादुई परफॉर्मन्स दिला, त्याने नेहा कक्कड भावुक झालेली दिसून आली.
दरम्यान या विशेष भागात गझल उस्ताद अनुप जलोटा आणि तलत अझीझ या भागात उपस्थित राहिले होते. या विशेष भागात 7 वर्षीय अरिभव एस. आणि 8 वर्षीय पिहू शर्माने ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है’ गीतावर जो जादुई परफॉर्मन्स दिला, तो अनुभवताना उपस्थितांनी त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिले आणि नेहा कक्कड तर फारच हेलावून गेली.
या दरम्यानर नेहा कक्कडने या दोन्ही गायकांना घट्ट मिठी मारली. त्यावेळी नेहा भावुक झालेली बघायला मिळाली. कक्कड म्हणाली, “मला खरं तर भावुक व्हायला आवडत नाही. पण या मुलांनी त्यांच्या परफॉर्मन्सने मला हलवून सोडले. जणू दोन दिव्य शक्ती गात होत्या. अविश्वसनीय आणि त्यांची निरागसता बघा, किती निर्मळ आहेत ते. शेवटचा आलाप तर अफलातून होता. त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची निष्ठा याचे हे फळ आहे. तुमच्या आवाजात श्रोत्याला शांत करण्याचे कसब आहे. मी तुमच्या दोघांचे गाणे आयुष्यभर ऐकू शकते. मी तिकीट काढून तुमचा शो पाहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शो करा आणि आमची मान अभिमानाने ताठ करा. तुम्ही दोघेही रॉकस्टार आहात. देवाचा आशीर्वाद तुम्हाला लाभो.”
त्या दोघांचे कौतुक करताना तलत अझीझ म्हणाला, “सात वर्षांच्या मुलांना तर पुरती स्वरओळख देखील नसते. आणि ही मुले काय सुंदर गायली. अप्रतिम, अनुप आणि मी आम्ही दोघेही थक्क झालो आहोत. खरोखर, पंकजजींनी तुमच्या दोघांचा हा परफॉर्मन्स ऐकला असता तर ते देखील हेलावून गेले असते. मी तुमच्यासाठी इतकेच म्हणेन, “जीते रहो, गाते रहो और ऐसा हंगामा करते रहो.”