मुंबई: सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे सुमारे पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा बोल बोल राणी या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून, लवकरच ते ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
हा चित्रपट ७ फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत.