मुंबई : दक्षिणेतील सुपरस्टार किच्चा सुदीप हा लोकप्रिय अभिनेता असून त्याच्या स्पष्ट वक्तव्याने अनेकदा चर्चेत असतो. मात्र सध्या सुदीप ३१ गायी दत्तक घेणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा ३१ गायी किच्चा दत्तक घेणार आहे.
कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या घरी अभिनेता सुदीप पूजेच्या निमित्ताने आला होता. यावेळी गायींच्या संवर्धनासाठी कर्नाटक राज्य सरकार करत असलेल्या कामाचे कौतुक केले.
त्याबरोबरीने कर्नाटक सरकारने पुण्यकोटी दत्तू योजनेच्या अॅम्बिसीडरपदी नियुक्ती केल्याने माझया जबाबदारीत वाढ झाली असल्याचे सुदीपने सांगितले.
कर्नाटक सरकारच्या या उपक्रमात अनेक राजकीय नेत्यांनी देखील आपला सहभाग नोंदविला आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वाढदिवसाच्या दिवशी ११ गायी दत्तक घेतल्या.
पुण्यकोटी दत्तू योजना राबविणारे कर्नाटक हे पहिलं राज्य आहे. कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर तब्बल 100 गोशाळा स्थापन झाल्या आहेत.