चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांची प्रकृती खालावली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
अभिनेते कमल हसन यांना बुधवारी ताप आला होता, त्यानंतर त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्यांना दोन ते तीन दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
विविध चित्रपटाद्वारे कमल हसन यांनी आपल्या अभिनयाची छाप पूर्ण भारतावर सोडली आहे. त्याबरोबरीने कलाप्रेमी म्हणून देखील त्यांची ओळख आहे. राजकीय पक्षाचे देखील ते नेतृत्व करत असल्याने त्यांचा मोठा चाहतावर्ग दक्षिण भारतात विखुरला आहे.