Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 स्मृती मंधानाच्या बालमित्राकडून संगीतकार पलाश मुच्छलवर 40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप; सांगलीत तक्रार दाखल 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 22 January 2026, 17:32

सांगली : बॉलिवूडमधील संगीतकार व दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बालमित्र असलेल्या विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल यांच्याविरोधात 40 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल केली आहे.

विज्ञान माने हे मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असून त्यांनी काही चित्रपटांसाठी फायनान्सर म्हणून काम केल्याची माहिती आहे. माने आणि पलाश मुच्छल यांची ओळख स्मृती मंधानाच्या कुटुंबीयांमार्फत झाली होती. या ओळखीच्या माध्यमातून पलाश यांनी त्यांच्या आगामी ‘नजरिया’ या चित्रपटासाठी गुंतवणुकीची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, चित्रपट पूर्ण होऊन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर गुंतवणूकदारांना रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन पलाश यांनी दिले होते. मात्र, चित्रपटाचे काम पूर्ण झाले नाही आणि गुंतवलेली रक्कमही परत मिळाली नसल्याचा आरोप माने यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच, सध्या पलाश यांच्याशी संपर्क साधता येत नसून, आपला मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचा दावाही माने यांनी केला आहे.

 

या तक्रारीनंतर सांगली पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून प्रकरणाची सत्यता तपासली जात आहे. दरम्यान, पलाश मुच्छल किंवा त्यांच्या टीमकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

या प्रकरणामुळे पलाश मुच्छल आणि स्मृती मंधाना यांच्यातील नातेसंबंधांबाबत पूर्वी झालेल्या चर्चांनाही पुन्हा उजाळा मिळाला आहे. दोघांच्या 2025 मधील लग्नाच्या घोषणा नंतर रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्या वेळी दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता.

दरम्यान, आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14
Next Post
pune news

Pune News : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडताना 'हे' वाचाच! आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे शाळांच्या वेळेत बदल, वाचा वेळापत्रक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.