मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाचे टिझर लवकरच लॉन्च होणार आहे. सिकंदर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या टिझर रिलिजसाठीची तारीख जाहीर केली आहे.
सिकंदर सिनेमाची निर्मिती सलमान खानचा खास मित्र साजिद नाडियादवाला करत आहे. तर दाक्षिणात्य दिग्दर्शक ए आर मुरुगदोस सिनेमाचं दिग्दर्शक करत आहेत. येत्या 27 डिसेंबरला भाईजानचा वाढदिवस आहे. भाईजानच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राईज असणार आहे.
या चित्रपटात सलमान खान, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अभिनेत्री काजल अग्रवाल हे स्टार्स प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. सध्या चित्रपटाच्या फायनल शेड्युलचं शूट सुरु असून क्लायमॅक्स शूट करायचा बाकी आहे. जानेवारीच्या शेवटपर्यंत चित्रपटाचं शूट पूर्ण होणार आहे.
दरम्यान ‘सिकंदर’ चित्रपटात भाईजानसोबत रश्मिका मंदानाही स्क्रिन शेअर करणार आहे. पहिल्यांदाच त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर या ॲक्शनपॅक्ड चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सलमानचे चाहते या बहुचर्चित चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत