मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या रिलेशनशिपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण नुकतेच श्रद्धा कपूरने तिच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर राहुल मोदीसोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने रोमँटिक गाणंही लावलं आहे. विशेष म्हणजे राहुलने तिची झोप उडवलीय, असं त्यात लिहिलंय. म्हणून श्रद्धाने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
श्रद्धा कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’चा लेखक राहुल सोबत तिने आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघेही एकत्र दिसत आहेत. या फोटोवर तिने कॅप्शन देत लिहिले की, ”यामध्ये “Dil rakh le, need to vaapis de de yaar” या फोटो कॅप्शनवर तिने स्माईली आणि फनी इमोजीसह हार्ट इमोजीदेखील पोस्ट केली आहे. या इन्स्टा स्टोरीवर तिने राहुललादेखील टॅग केले आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये जेव्हा ती एका व्यक्तीसोबत पोहोचली, तेव्हापासून तिच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेाच्या शूटिंगदरम्यान श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांची जवळीक वाढली.