नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कन्नडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने जगाचा निरोप घेतला आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. ५२ वर्षीय कन्नडचे दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवलं आहे. गुरुप्रसाद यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गुरुप्रसाद यांच्या जाण्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा झटका बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला आहे. कर्नाटकातील मदनैयाकहल्ली भागातील त्यांच्या घरात गुरुप्रसाद यांचा मृतदेह सापडला. गुरुप्रसाद मागील ८ महिन्यांपासून त्या घरात राहत होते. दिग्दर्शकांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना घरातून दुर्गंध येऊ लागल्याने त्यांच्या शेजारी लोकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस तपासात घरात कुजलेल्या अवस्थेत गुरुप्रसाद यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह..
पोलीस दिग्दर्शक गुरुप्रसाद यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ‘गुरुप्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच जीवन संपवलं. त्यांचा मृतदेह सडण्यास सुरुवात सुरुवात झाली होती. गुरुप्रसाद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास करण्यात येत आहे. गुरुप्रसाद हे कर्जात बुडाले होते. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी जीवन का संपवलं, याचा तपास पोलिस करत आहेत. त्यांचे काही चित्रपट फ्लॉप गेल्याने ते आर्थिक अडचणीत सापडल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यामुळे त्यांनी जीवन संपवलं असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुप्रसाद यांनी २००६ साली दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.