मुंबई : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हिने रविवारी मुंबई येथील वांद्रे येथे बॉयफ्रेंड झहीर इक्बाल सोबत लग्नगाठ बांधली. सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
सोनाक्षीच्या लग्नामुळे तिचे वडील व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे नाराज असल्याच्या अनेक चर्चा सुरु होत्या. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला जाणार नसल्याबद्दलही बोलले जात होते. मात्र तसे काही नसून शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला हजर होते.
दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं की, ‘जेव्हा बाप त्याच्या लेकीचा हात तिने निवडलेल्या मुलाच्या हातात देतो, या क्षणाची प्रत्येक बाप वाट पाहत असतो. माझी मुलगी झहीरसोबत जास्त आनंदी आहे आणि माझ्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. देवाचे आशीर्वाद त्यांच्यासोबत कायम राहू देत.
सोनाली व झहीरने अगदी साधेपणाने लग्न केलं आहे. सोनालीने लग्नात पांढऱ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती, तर झहीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्नावेळी सोनालीचे वडील शत्रुघ्न सिन्हाही खूप आनंदी असल्याचे दिसले.